Monday, September 15, 2008

व्यवहार
जगातली प्रत्येक गोष्ट एक व्यवहार आहे असं वाटत नाही तुम्हाला?

म्हणजे बघा, कधीतरी रस्त्यावरच्या भिकार्याच्या पारडयात तुम्ही एका हाताने पैसे टाकता, आणि दुसर्या हाताने पुण्य खिशात टाकता.. काही लोक पुण्य मानत नाहीत.. मग ते लोक दयेच्या बदल्यात समाधान घेतात..

देवाला नारळ वाढवतात, त्या बदल्यात नोकरी मागतात.. अकरा रुपये देवून मार्क मागता.. कधी कधी तर देवाकडे नवस बोलतात आणि कार्य पुर्ण झाल्याची पक्की खात्री झाल्याशिवाय फेडतही नाहीत.. म्हणजे या व्यवहारात देवावरही त्यांचा विश्वास नसतो.. काय सांगावं.. अभिषेक, पुजाअर्चा सगळं करुन घ्यायचा आणि काम करायचं तेवढं विसरुन जायचा..

कामाच्या बदल्यात पगार.. मदतीच्या बदल्यात मदत.. वेळेच्या बदल्यात वेळ..

आणि प्रेमाच्या बदल्यात प्रे... अं.. इथं मात्र अडखळायला होतं..

प्रेमाचे व्यवहारच का फ़सतात? इथंच नेहमी हिशोब का लागत नाही?

कदाचित प्रत्येकाच्या प्रेमाची currency वेगवेगळी असते..

ती तिकडे डॉलरमध्ये मोजकंच हसते, आणि तुमच्या रुपय़ांमध्ये ते लाखमोलाचं भरतं..

कदाचित प्रेम मोजताच येत नाही यामुळे असेल...

म्हणजे तुम्ही इकडे प्रेमाचे चेक भरभरुन पाठवत राहता.. पलीकडे कोणी कधी एनकॅशच करत नाही.. तुमचा balance संपला तरी पलीकडच्या account ला पत्ता लागत नाही..

म्हणुन वाटतं.. प्रेमाच्या हिशोबवहित फ़क्त एकच column असतो..खर्चाचा... जम्याशी पडताळा असली भानगडच नसते तिथं..2 comments:

Sangram said...

nice one ... I could also see the ring in one of the hand. very neat n nice sketch - apt for this blog.

atma said...

मित्रा... लिहायचं का थांबलंय?